Dehugaon Political News : देहूगाव नगरपंचायत निवडणूक ; ‘हे’ आहेत शिवसेनेचे अधिकृत 8 उमेदवार

Pckhabar- नव्याने निर्माण झालेल्या देहू नगरपंचायती निवडणूकीसाठी
शिवसेनेच्या वतीने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकृत 8 उमेदवारांची नावे आज (मंगळवार) जाहीर केली आहेत. या उमेदवारांना पक्षाचा अधिकृत एबी फाॅर्म देण्यात आल्याची माहिती देहूगाव शिवसेनेचे शहर प्रमुख सुनिल हगवणे यांनी दिली आहे.
देहूगाव नगरपंचायत निवडणूकीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ओबीसींच्या प्रभाग 11, 12, 14, 15 मधील निवडणूक स्थगित झाली आहे.
चार प्रभाग वगळून निवडणूक होणार आहे.
शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आणि प्रभाग पुढीलप्रमाणे:
1) बाई दादासाहेब केदारी
3) शैलाताई खंडागळे
4) गौतम हजारे
5) सचिन विठ्ठल काळोखे
8) अक्षदा अभिजित कंद
9) मंगल लगाडे
10) पुरूषोत्तम प्रशांत भालेकर
17) ज्योतीताई रोहिदास टिळेकर











Leave a Reply