Chikhali News : कुदळवाडीत वीस पत्राशेडवर महापालिकेचा हातोडा

Chikhali News : कुदळवाडीत वीस पत्राशेडवर महापालिकेचा हातोडा


Pckhabar- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रिय अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने प्रभाग २ मधील कुदळवाडी परिसरातील रस्तारुंदी करणातील सुमारे वीस पत्राशेड वरील चाळीस हजार चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

कार्यकारी अभियंता संजय घुबे व सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. उपअभियंता एस एस मोहिते यांच्या सह पोलीस निरीक्षक एस एम देशमुख , व अतिक्रमण पथकाचे कर्मचारी सहभागी होते.

विकास आराखड्यातील रस्तारुंदीकरणात असणारे सुमारे २० अनधिकृत पत्राशेड या कारवाईत पाडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *