Sangvi News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर

 

Sangvi News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Pckhabar- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर महिला उपाध्यक्षा उज्वला ढोरे, सांगवी विकास मंचाच्या महिला अध्यक्षा नीलिमा भागवत यांच्या संयुक्त विद्यमानाने सांगवी येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला सांगवी परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

या आरोग्य शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने करून करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, नगरसेवक नाना काटे, प्रभाकर वाघेरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अरुण पवार, सनी ओव्हाळ, बाळासाहेब पिल्लेवार, शाम जगताप, शिवाजी पाडुळे, महेश भागवत, ओंकार महेश भागवत, सुनील ढोरे, मंडळाचे कार्यकर्ते संतोष चव्हाण, बाळासाहेब नाईक, अधिराज शितोळे, भटू शिंदे, मयूर मधाळे, सुजित जाधव, दिनेश केदारी, मुख्य समन्वयक तेजस भगत, पश्चिम जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

या शिबिरात लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड यांच्या तर्फे मोफत कर्करोग तपासणी, क्रिस्टल आय केअर यांच्या तर्फे मोतीबिंदू तपासणी करून निदान झालेल्या रुग्णांना डोळे तपासणी करून त्या सर्व रुग्णांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. तसेच एम्स हॉस्पिटल, चाकण क्रिटिकल हॉस्पिटल, ज्ञानमोटे हॉस्पिटल, एन्सोकेअर रेडिओलॉजी अँड डायगनोस्टीक सेंटर, अन्वय क्लिनिक यांच्या तर्फे आयुर्वेदिक मोफत तपासणी व त्यांच्या तर्फे आयुर्वेदिक औषध वाटप करण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *