Dehugaon political News : कोणी युती करो नाहीतर न करो, येईल त्यांच्यासह न येईल त्यांच्या शिवाय निवडणूक लढवू : शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर

Pckhabar- देहूगाव नगरपंचायतच्या निवडणुकीत कोणी युती करो नाहीतर न करो, येईल त्यांच्यासह न येईल त्यांच्या शिवाय निवडणूक लढवली जाईल. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोतच, विजय आपलाच होणार असून सर्वानी एक दिलाने कामाला लागावे, असे आवाहन
शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना केले.
देहूगाव नगरपंचायतच्या निवडणूकी निमित्ताने येथील संत कृपा मंगल कार्यालयामध्ये शुक्रवारी शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मावळ तालुका संपर्क प्रमुख गणेश जाधव, शिवसेना महिला जिल्हा संघटीका शैला खंडागळे, महिला संपर्क प्रमुख लतिका फास्टे, युवासेना महाराष्ट्र विस्तारक राजेश पळसकर, उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे, युवासेना उपआधिकारी पुणे जिल्हा अनिकेत घुले, तालुका प्रमुख राजेश खाडभोर, महिला संघटीका अनिता गोणते, मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, मावळ तालुका संघटक सुरेश गायकवाड, देहूगाव शिवसेना शहर प्रमुख सुनिल हगवणे, तळेगाव शहर प्रमुख दत्तात्रय भेगडे, देहूरोड महिला संघटीका श्रीमती सुनंदा आवळे, लोणावळा नगरपरिषदेच्या नगरसेविका कल्पना आखाडे, मोसीन शेख युवासेना उपआधिकारी, युवासेना उपआधिकारी मावळ तालुका विशाल दांगट, शिवसेना मा हवेली तालुका उपप्रमुख रमेश हगवणे, देहूरोड शहर सल्लागार देवा कांबळे इतर देहूगाव शिवसेना सर्व पदाधिकारी, उमेदवार उपस्थित होते.
देहूगाव नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनेही जोरदार तयारी सुरु आहे. नगरपंचायतसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. नगरपंचायतच्या 17 जागांसाठी शिवसेनेचे 12 उमेदवारांची नावे अतिंम झाली आहेत.







Leave a Reply