Lonavala News : … त्यामुळे मला स्मशानभूमीचे उद्घाटन करायला भीती वाटते : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Lonavala News : … त्यामुळे मला स्मशानभूमीचे उद्घाटन करायला भीती वाटते : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस


Pckhabar-नागपूर महापालिकेचा मी महापौर असताना स्मशानभूमीच्या उद्घाटनाला मला बोलविण्यात आले होते. त्यावेळी एक डेड बॉडी आणून त्याला अग्नी माझ्या हस्ते देण्यात आली होता. त्यामुळे मला स्मशानभूमीचे उद्घाटन करायला भीती वाटत असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

लोणावळा नगरपरिषदेच्या माध्यमातून नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात  उभारण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले आणि संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे अनावरण, जलशुद्धीकरण केंद्र, कैलास स्मशानभूमी अशा एकूण सुमारे 42 कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (शुक्रवार) करण्यात आले. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे आदी मान्यवर उपस्थित होते.

  स्मशानभूमीचे उद्घाटन झाल्यानंतर फडणवीस यांनी आपल्या भाषणात नागपूर येथील एक किस्सा सांगितला. ते म्हणाले ’’नागपूर महापालिकेचा मी  महापौर असताना स्मशानभूमीच्या उद्घाटनाला मला बोलविण्यात आले होते. त्यावेळी एक डेड बॉडी आणून त्याला अग्नी माझ्या हस्ते देण्यात आली होता. त्यामुळे मला स्मशानभूमीचे उद्घाटन करायला भीती वाटत असल्याचे फडणवीस यांनी सांगितल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र लोणावळ्यात स्मशानभूमीचे उद्घाटन करताना असे काही केले गेले नाही. त्यामुळे बरे वाटल्याचे ते म्हणाले”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *