Talegaon Dabhade Crime News : उघडा दरवाजा ठेवून झोपणे तरूणाला पडले महाग

Pckhabar- घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपणे एका तरूणाला चांगलेच महाग पडले आहे. उघड्या दरवाज्यातून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्याने घरातील मोबाईल, लॅपटॉप, रोक रक्कम, दोन एटीएम कार्ड असा 31 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी सकाळी साडेनऊ ते साडेदहा या दरम्यान तळेगाव दाभाडे येथील यशवंतनगर येथे घडली.
अक्षय हिरालाल सावंत (वय-24, रा. राज अपार्टमेंट, तपोधाम कॉलनी, यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा बुधवारी सकाळी घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपी गेला होता. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून 9 हजार रूपये किंमतीचा मोबाईल, 20 हजारांचा लॅपटॉप, 1200 रूपयांची रोकड, मतदान कार्ड, आधार कार्ड, दोन एटीएम कार्ड असा ऐवज चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.











Leave a Reply