देहूगावात कोरोनाचे 12 नवे रूग्ण , एकाचा मृत्यू

देहूगावात कोरोनाचे 12 नवे रूग्ण , एकाचा मृत्यू

Pckhabar- देहूगावात मंगळवारी कोरोनाचे 12 नव्या रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देहूत आजपर्यंत 215 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. आतापर्यंत 157 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 52 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.

देहूत मंगळवारी कोरोनाच्या 12 नव्या रूग्णांची नोंद झाली असून 1 रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत 215 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी 157 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 52 जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये 31 रूग्णांना लक्षणे नसून 21 रुग्णांना लक्षणे आहेत. 20 रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *