Bhosari News : सूक्ष्म निरीक्षण आणि दूरदर्शी नियोजन हीच यशाची पहिली पायरी : प्रा.डॉ.अरुण आंधळे

Bhosari News : सूक्ष्म निरीक्षण आणि दूरदर्शी नियोजन हीच यशाची पहिली पायरी : प्रा.डॉ.अरुण आंधळे

Pckhabar- ”माणूस घडण्यासाठी परिस्थिती हा घटक महत्त्वाचा आहे. सूक्ष्म निरीक्षण करणे समाज परिस्थितीचे भान ठेवणे व वास्तवामध्ये जगणं हे परिस्थितीवर मात करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे”; असे मत रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध येथील प्राचार्य डॉ.अरुण आंधळे यांनी व्यक्त केले.

भोसरी येथील रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी आणि भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे प्रीतम प्रकाश कला आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रमाचा उदघाटन समारंभ व स्वर्गीय प्रा. प्रकाश नेनसुख पगारिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाचवी ‘प्रकाश व्याख्यानमाला’महाविद्यालयामध्ये सुरू झाली. प्रथम पुष्प गुंफताना प्राचार्य डॉ.अरुण आंधळे बोलत होते.

या व्याख्यानमालेचे उदघाटन व नवीन अभ्यासक्रमाचे उदघाटन माननीय डॉ. गौतम बेंगाळे विभागीय संचालक पुणे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी व्याख्याते प्रा. डॉ. अरुण आंधळे प्राचार्य रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध, कार्यक्रमाचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे, प्रमुख पाहुणे मा. संतोष वामन विभागीय कक्ष अधिकारी पुणे, संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, उपाध्यक्ष मा.विलासकुमार पगारिया महाविद्यालयाचे प्राचार्य सदाशिव कांबळे, मुख्य संयोजक प्रा. पांडुरंग भास्कर उपस्थित होते.

प्रा. डॉ. गौतम बेंगाळे यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात बदलत्या समाज जीवनामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान यामुळे माणूस माणसापासून विभक्त होत चालला आहे. नाती नष्ट होत चाललेले आहेत. कुटुंब व्यवस्था विस्कळीत झालेली आहे; अशा परिस्थितीत माध्यमांचा योग्य वापर केला गेला पाहिजे. माध्यमांमुळे माणूस माणसापासून दूर चाललेला आहे; असे मत व्यक्त केले.

तसेच आपल्या प्रास्ताविक मनोगतातून प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी आपले बंधू प्रेमाबद्दलचा ओलावा व्यक्तकरून आजतागायत विविध उपक्रमांनी मी माझ्या बंधूचे स्मरण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रा. प्रकाश पगारिया यांच्या निधनानंतर सातत्याने ३७ वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन पगारिया परिवार आणि पार्श्वनाथ क्रीडा मंडळ, कासारवाडी यांच्या वतीने केले जाते व गेल्या ५ वर्षापासून महाविद्यालयाच्या वतीने प्रकाश व्याख्यानमालेचे आयोजन केले जात आहे. आज सुध्दा रक्तदान शिबिराबरोबर मोफत कोव्हिड लसीकरणाचे शिबिर आयोजित करून विद्यार्थीपयोगी व समाजपयोगी कार्यक्रम राबवणे ही खरी श्रद्धांजली प्रा. प्रकाश पगरिया यांना ठरेल अशी भावना व्यक्त केली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात माननीय बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी आज परिस्थिती प्रामाणिकपणा व स्वकर्तृत्वाने काम करा. आपल्या जीवनात बदल घडल्याशिवाय राहणार नाही असा संदेश दिला.
प्रा. विभा ब्राह्मणकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पांडुरंग भास्कर मुख्य संयोजक प्रकाश व्याख्यानमाला यांनी आभार मानले.
सदर व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ. विजय निकम, प्रा. प्रशांत रोकडे, प्रा.उमेश लांडगे, प्रा. डॉ.स्वाती वाघ, प्रा.सुधाकर बैसाणे, प्रा.महालक्ष्मी ठुबे, प्रा. सचिन पवार, प्रा. रूपाली आगळे व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी एकता महिंद्रकार रूपाली मोठे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *