Dehugaon News : देहूगावात उद्या HEALTH AWARENESS RIDE चे आयोजन

Dehugaon News : देहूगावात उद्या HEALTH AWARENESS RIDE चे आयोजन

वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित कांबळे, डॉ. किशोर यादव यांची माहिती

Pckhabar- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम जनजागरण मोहिमे अंतर्गत INDO ATHLETIC SOCIETY व प्राथमिक आरोग्य केंद्र, देहू यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या सकाळी ( बुधवार) देहूगावात HEALTH AWARENESS RIDE चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित कांबळे, डॉ. किशोर यादव यांनी दिली.

स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त दि. 16 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 2021 या कालावधीत असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत निदान व जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदलाबाबत विशेष मोहिम पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत उद्या सकाळी (बुधवार) साडेसहा ते साडेसात या वेळेत
HEALTH AWARENESS RIDE चे आयोजन करण्यात आले आहे. या RIDE ची सुरुवात गाथा मंदिरापासून होणार असून प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सांगता होणार आहे.

दरम्यान,  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार 30 वर्षावरील लोकांचे पाच आजाराकरीता उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचे आरोग्य केंद्रामध्ये तपासणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *