Talegaon Dabhade News: प्रभाग क्रमांक 3 मध्ये उद्यानाचे भूमिपूजन, ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणीचे गुरुवारी लोकार्पण
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांची माहिती

Pckhabar- तळेगाव दाभाडे येथील प्रभाग क्रमांक 3 मध्ये सिमको काॅलनीत उद्यानाचे भूमीपूजन, सत्यकमल कॉलनीत ओपन जिम व लहान मुलांसाठी खेळणी तर वनश्री नगर येथील श्रीरंग कला निकेतन येथे लहान मुलांसाठी खेळणीचे गुरूवारी लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी दिली.
दि. 2 डिसेंबर (गुरूवार) सायंकाळी पाच वाजता हे कार्यक्रम होणार आहेत.
प्रभाग क्रमांक 3 मध्ये सिमको काॅलनीतील सिद्धिविनायक नेस्ट सोसायटी समोर उद्यानाचे भूमीपूजन, सत्यकमल कॉलनीत ओपन जिम व लहान मुलांसाठी खेळणी तर वनश्री नगर येथील श्रीरंग कला निकेतन येथे लहान मुलांसाठी खेळणीचे लोकार्पण माजी नगराध्यक्षा विद्यमान नगरसेविका श्रीमती सुलोचना आवारे यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी नगरसेवक गणेश खांडगे, स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे, बांधकाम समितीचे सभापती निखिल भगत, नगरसेवक संग्राम काकडे, नगरसेवक रोहित लांघे, माजी नगरसेवक रविंद्र आवारे, नगरसेविका अनिता पवार, माजी नगरसेवक सुनिल कारंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याबाबत विरोधी पक्षनेते गणेश काकडे म्हणाले की” प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांसाठी सिमको काॅलनीत उद्यानाचे भूमीपूजन, सत्यकमल कॉलनीत ओपन जिम व लहान मुलांसाठी खेळणी तर वनश्री नगर येथील श्रीरंग कला निकेतन येथे लहान मुलांसाठी खेळणीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यासाठी आपण नगरपरिषद प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.”











Leave a Reply