Omicron Variant News : ओमिक्रॉनचा धोका, आंतरराष्ट्रीय विमान सेवा तात्पुरती बंद करा; मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीची मागणी

Pckhabar- ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटमुळे काही देशात धुमाकूळ घातला आहे. या विषाणूचा वेग प्रचंड असून अनेक नागरिक बाधित होत आहेत. त्यामुळे ओमिक्रॉन बाधित देशाची आंतरराष्ट्रीय विमान सेवा तात्पुरती बंद करण्याची विनंती, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहसचिव अजय भुल्ला केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांना पत्र पाठवून केली आहे.
याबाबत पंतप्रधान मोदी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना विषाणू मुळे जग संकटात सापडलेला असतानाच नूकतेच जागतिक आरोग्य संघटणेने ओमिक्राँन(व्हेरीएंट)अनेक देशात थैमान घालत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. या आजारामध्ये रुग्ण वाढीचा वेग दुप्पट असल्याचे सांगितले आहे.सध्या अनेक देश लालकडाऊमध्ये आहेत. दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात हा विषाणू नागरिकांना संक्रमीत करीत आहेत. जर्मनी, इटालीसह अनेक देशात रुग्ण वाढताना दिसत आहेत आपल्या देशातील नागरीकांचे हित लक्षात घेऊन व मागील सुरुवातीच्या काळातील अनुभव लक्षात घेता लवकरात लवकर ओमिक्राँन बाधित देशाची अांतरराष्ट्रीय विमान सेवा लवकर बंद करून प्रत्येक अंतराष्ट्रीय प्रवास करणार्या प्रत्येक नागरीकांची विमानतळावरच तपासणी करून त्यांना नियमानुसार कोरांटाईन करावे.
शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की, प्रत्येक बाधित देशातील भारतीयांना भारतात परत येण्याची ईच्छा आहे त्यांना वेळ देऊन बोलवून घ्यावे. नंतर काही काळापुरती बाधित देशातील अंतराष्ट्रीय विमान सेव बंद करावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबरच केंद्रीय गृह सचिव अजय भुल्ला, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांच्याकडे केल्याचे सांगितले. पाठवलेल्या निवेदनावर संस्थाध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, सह सचिव गजानन धाराशिवकर, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्यक्षा संगिता जोगदंड यांच्या स्वाक्षरी आहेत.











Leave a Reply