
Sports News : मास्टर गेम्समध्ये ‘पुणे लिजेंड’ ठरला बाजीगर; ठाणे डिस्ट्रिक लिजेंडचा ४-१ ने पराभव
Pckhabar-भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंदापूर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून फिट इंडिया उपक्रमांतर्गंत मास्टर गेम्स असोसिएशन महाराष्ट्र व इंदापूर महाविद्यालय इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या चार दिवसाच्या मास्टर गेम्समध्ये फूटबॉलच्या अंतिम सामन्यात पुणे लिजेंडने ठाणे डिस्ट्रिक लिजेंडचा ४-१ने दणदणीत पराभव करीत विजेतेपद पटकावले.
पुणे लिजेंड्चे कर्णधार आलोक शर्मा, मनोज बाळकृष्णन, कुमार बालकृष्णन, राहुल कड, प्रदीप मेनन, ऍंथोनी चावडी यांनी उत्कृष्ट खेळ केला. विजयी संघाला चषक देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून हा संघ या स्पर्धेत विजय संपादन करीत आहे. यामध्ये राष्ट्रीय फूटबालपटू व संघाचे कर्णधार अलोक शर्मा यांचे मोठे योगदान आहे.
माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन झाले. मास्टर गेम्स स्पर्धेचे अध्यक्ष दिपू के, उपाध्यक्ष सुनील जाधव, सचिव बाळा चव्हाण, राष्ट्रीय खेळाडू सुजित बडदे, महेंद्र बाजारे, केतान डिसिल्वा, प्रभाकर दुबे, महेश चावले, ॲड. मनोहर चौधरी, प्रा.बाळासाहेब खटके, विलास वाघमोडे, तुकाराम जाधव, गणपत भोंग, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, डॉ.महादेव वाळुंज, प्रा.नागनाथ ढवळे उपस्थित होते.











Leave a Reply