Dehugaon Accident News : ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने महिला ठार, मुलगा जखमी

ही बातमी शेअर करा.

Dehugaon Accident News : ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने महिला ठार, मुलगा जखमी


देहूगावात कमानीजवळ घडली घटना
Pckhabar- मुलाला घेऊन दवाखान्यात जाणार्‍या एका दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव वेगातील ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना गुरूवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास देहूगाव येथील कमानीसमोर घडली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.

ऋतुजा अनिल जाधव (वय-26, रा. देहू-आळंदी रोड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे पती अनिल आनंदा जाधव (वय-31) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक वैजनाथ कैलास खाडे (वय-30, रा. देहूगाव) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलाला दात येत असल्याने व जुलाब होत असल्याने त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून दवाखान्यात जात होते. देहूगाव येथील कमानजवळ आल्यानंतर पाठीमागून येणारा ट्रक (एमएच.14, एच.जी. 4044) वरील चालक ट्रक भरधाव वेगाने चालवत होता. त्याने फिर्यादी यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. ऋतुजा या खाली पडल्या असता त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला. तर मुलाला किरकोळ दुखापत झाली. त्यांच्या दुचाकीचेही नुकसान केले. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.


ही बातमी शेअर करा.