
Pimpri News : रहाटणीत अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा
Pckhabar-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत गुरुवारी अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यात आली.
रहाटणी (प्रभाग क्र. २७) नढे कॉर्नर, शिवलीला कॉलनी, शिवालय कॉलनी, शिवधाम कॉलनी, तापकीर मळा परिसरातील ही बांधकामे आहेत.
या कारवाईत 13 हजार 461 चौरस फूट बांधकामे नष्ट करण्यात आली.
ही कारवाई ०३ जेसीबी, १ डम्पर, १२ मजूर, ०२ ब्रेकर आणि मनपाचे २५ पोलीस कर्मचारी अधिकारी, वाकड पोलीस स्टेशनचे १२ पोलीस कर्मचारी अधिकारी याचे सहकार्याने केली.
ही कारवाई आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त (२) जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता मकरंद निकम, यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता सुनील भागवानी, क्षेत्रीय अधिकारी रविकिरण घोडके यांचे नियंत्रणाखाली उपअभियंता नितीन निंबाळकर, ०२ कनिष्ठ अभियंता, ०५ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व १२ मनपा कर्मचारी यांचे पथकाने केली.











Leave a Reply