Dehugaon News: देहूतील प्रलंबित विकासकामांची जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, आमदार सुनिल शेळके यांनी केली पाहणी

Dehugaon News: देहूतील प्रलंबित विकासकामांची जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, आमदार सुनिल शेळके यांनी केली पाहणी

Pckhabar- श्री क्षेत्र देहू येथील प्रलंबित विकासकामांची जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके यांनी बुधवारी पाहणी केली.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत जी कामे झाली आहेत. त्यातील अनेक कामे अर्धवट असून काही कामांमध्ये अनेक त्रुटी राहिलेल्या दिसून येत आहेत. व्यापारी गाळे हस्तांतर प्रक्रिया प्रलंबित असून संबंधित गाळे अनेक दिवसांपासून धूळखात पडले आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे होणे गरजेचे आहे.त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी यावेळी केली. सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली असता वाढत्या नागरीकरणामुळे या प्रकल्पावर ताण येत असून यामध्ये अधिक सुधारणा करण्याची गरज असल्याचे दिसून आले.

भुयारी गटार, सांडपाणी व्यवस्थापन या कामांमधील त्रुटींमुळे स्थानिक नागरिकांना वारंवार त्रास सहन करावा लागत आहे.
देहू शहरातील प्रलंबित असलेल्या कामांमधील कमतरता दूर करण्यात येतील. आवश्यक विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल,असे आश्वासन अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकार्‍यां समोर दिले आहे. त्यामुळे प्रलंबित कामे लवकर मार्गी लागावी यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी मी नेहमीच आग्रही असल्याचे आमदार सुनिल शेळके यांनी म्हटले आहे.

यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, इतर अधिकारी तसेच आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *