Pimpri News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलक्षणा शिलवंत-धर यांचे नगरसेवक पद रद्द, ‘हे आहे कारण’

Pimpri News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलक्षणा शिलवंत-धर यांचे नगरसेवक पद रद्द, ‘हे आहे कारण’

Pckhabar- कोरोनाच्या जागतिक महामारीत पिंपरी-चिंचवड महापालिकेला 10 लाखांचे मास्क पुरविणा-या एॅडीसन लाईफ सायन्स कंपनीशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचे संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे धर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी निर्णय दिला आहे. धर यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरातील झोपडपट्टीमधील नागरिकांना वाटप करण्यासाठी दहा लाख रुपयांच्या मास्कची थेट खरेदी केली होती. यापैकी मे. एडिसन लाईफ सायन्स प्रा. लि. या कंपनीने 1 लाख मास्कचा प्रतिनग दहा रुपये या प्रमाणे पुरवठा केला होता. त्यापोटी दहा लाख रुपये पालिकेने या कंपनीला अदा केले होते. लोकप्रतिनिधी संबंधित असलेल्या कोणत्याही कंपनीला अथवा संस्थेला आर्थिक फायद्यासाठी निविदा प्रक्रियेत सहभाग नोंदविता येत नाही. मात्र, एडिसन लाईफ सायन्सेस या कंपनीमध्ये सुलक्षणा शिलवंत यांचे पती राजू धर व त्यांचे बंधू राजरत्न शिलवंत हे संचालक असल्यामुळे माजी नगरसेवक व शिवसेनेचे पदाधिकारी जितेंद्र ननावरे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेसंदर्भात न्यायालयाने विभागीय आयुक्तांना सहा आठवड्यात निर्णय घेण्यासंदर्भात आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज अंतिम निकाल जाहीर केला आहे.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की,
नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचे
एॅडीसन लाईफ सायन्स कंपनीशी संबंध असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे धर या महापालिका सदस्य म्हणून पदावर राहण्यास अनर्ह आहेत. त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे असा स्पष्ट निष्कर्ष विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *