Talegaon Dabhade Crime News : पुढे एका बाईचा खून झाला असल्याची बतावणी; तोतया पोलिसांनी महिलेचे दागिने केले लंपास

Talegaon Dabhade Crime News : पुढे एका बाईचा खून झाला असल्याची बतावणी; तोतया पोलिसांनी महिलेचे दागिने केले लंपास


Pckhabar- तिघांनी एका महिलेला पुढे महिलेचा खून झाला असून आम्ही पोलीस आहोत. तुमच्याकडील दागिने काढून पिशवीत ठेवा, अशी बतावणी करून तीन तोतया पोलिसांनी महिलेचे दीड लाखांचे दागिने हात चलाखीने लांबवले. ही घटना तळेगाव- चाकण रोडवरील शितल स्वीट होम समोर मंगळवारी दुपारी दिडच्या सुमारास घडली.

याप्रकरणी यशवंतनगर येथील 58 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मंगळवारी दुपारी तळेगाव- चाकण रोडवरील शितल स्वीट होम समोरून जात होत्या. त्यावेळी तेथे आलेल्या तिघांनी पोलीस असल्याचे सांगितले. पुढे एका महिलेचा खून झाला असून तुमच्याकडील दागिने काढून पिशवीत ठेवा, अशी बतावणी केली. दागिन्यांची नोंद करायची असल्याचे सांगून त्यांच्याकडील दागिने घेतले. ते दागिने पिशवीत ठेवण्याचा बहाना करून तोतया पोलिसांनी महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याच्या बांगड्या असे 1 लाख 60 हजार रुपयांचे दागिने हात चलाखीने लांबवले.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *