
Chinchwad Crime News : धक्कादायक! आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयावर टाकला पेट्रोल बॉम्ब

घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली धाव
Pckhabar- चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू उद्योजक शंकर जगताप यांच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आला आहे. ही घटना आज (मंगळवार) दुपारी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. पिंपळे सौदागर येथे त्यांचे कार्यालय आहे. आज दुपारी ते कार्यालयात होते. दुपारी ॲक्टिवा दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब टाकला. मात्र, हा बॉम्ब कार्यालयाच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक डीपीवर पडला. सुदैवाने हा बॉम्ब कार्यालयावर पडला नसल्याने घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.











Leave a Reply