Talegaon Dabhade Crime News : ज्यादा पावाच्या पैशावरून पाच मित्रांना मॉलमधील कर्मचार्यांकडून मारहाण

Pckhabar-नाष्टा करून झाल्यानंतर ज्यादा पावाच्या पैशांवरून पाच मित्रांना फुड मॉलमधील सात ते आठ जणांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने, लोखंडी पाईपने मारहाण केली. ही घटना उर्से टोल नाक्याजवळील फुड मॉलमध्ये रविवारी सकाळी पावणेसात वाजता घडली.
याप्रकरणी स्वप्निल बाळासाहेब ढोरे (वय-28, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार फुड मॉलमधील कॅशियर, कामगार, आचारी अशा 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ढोरे आणि त्यांचे मित्र अक्षय लोणारी, जयदिप पिल्ले, रोहन बालवडकर, अनिरूध्द पाडाळे हे रविवारी सकाळी उर्से टोलनाका येथील फुड मॉलमध्ये नाष्टा करण्यासाठी थांबले होते. नाष्टा करून झाल्यानंतर ज्यादा पावांच्या पैशांवरून फिर्यादी आणि आरोपी यांच्यात वाद झाला. यावेळी मॉलमधील 7 ते 8 जणांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत लोखंडी पाईप, लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून जखमी केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.











Leave a Reply