Pimpri News : सत्ताधाऱ्यांची मुजोरी जास्त काळ चालत नाही, हे शेतकरी आंदोलनाने सिद्ध केले : अजित अभ्यंकर

Pimpri News : सत्ताधाऱ्यांची मुजोरी जास्त काळ चालत नाही, हे शेतकरी आंदोलनाने सिद्ध केले : अजित अभ्यंकर


Pckhabar- भारतासारख्या देशामध्ये सतत खोटे बोलून… सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर करून आणि लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करून राज्य करता येणार नाही.. याचे दर्शन शेतकऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या आंदोलनामधून दिसून आले आहे.. सत्तेची मुजोरी आलेल्या मोदी आणि शहा सरकारला शेतकऱ्यांनी उत्तम धडा शिकवला असून येत्या काळात त्यामधून भारतातील अदानी अंबानी यांच्या कार्पोरेटशाही ला चाप लावण्यासाठी जनतेचे हात बळकट झाले आहेत. सत्य अहिंसा आणि संयत मार्गाचा अवलंब करूनही आंदोलने यशस्वी करता येतात, याचा वस्तुपाठ शेतकऱ्यांनी आपल्या संयमतून घालून दिला आहे.  कामगार चळवळीने यांच्यापासून प्रेरणा घ्यावी “असे आवाहन कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर अधिवेशनाचे उद्घाटन चिखली करताना केले.

एस टी कर्मचाऱ्यांचा संप आणि राज्यातील कामगार वर्गाच्या विविध मागण्या यावर बोलताना ते म्हणाले की,

महाराष्ट्राच्या आघाडी सरकारने शेतकरी आंदोलनापासून बोध घेतला पाहिजे,केंद्र सरकारने बदललेले नवे कामगार कायदे महाराष्ट्रात लागू होणार नाहीत, शेतकरी विरोधी कायदे केले जाणार नाहीत,यासाठी राज्यसरकारने स्पष्ट धोरण आखण्याची गरज आहे.

एस टी संपाबाबत ते म्हणाले की, महामंडळाचे कर्मचारी आणि लाखो प्रवासी महाराष्ट्राला समृद्ध करत असतात.विश्वसनीय आणि माफक दरात  सेवा  देणाऱ्या महामंडळाचे खाजगीकरण करण्याच्या योजना सरकारने सोडून द्याव्यात. त्याच प्रमाणे एसटी कामगारांच्या संपाला चिथावणी देऊन संधिसाधू भूमिका घेणाऱ्या भाजपची एस टी संपाबाबतची भूमिका खोटारडी, दांभिक आणि चिथावणीखोर असल्याची उदाहरणे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस  चंद्रकांत पाटील इत्यादी नेत्यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.

यावेळी कॉम्रेड नाथा शिंगाडे,सचिव पुणे जिल्हा माकप कॉम्रेड गणेश दराडे,सचिव माकप पिंपरी चिंचवड यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *