Pimpri News : स्वच्छता कामगारांना प्रोत्साहन द्या ते शहराला प्रथम क्रमांकावर नेतील :  काशिनाथ नखाते

Pimpri News : स्वच्छता कामगारांना प्रोत्साहन द्या ते शहराला प्रथम क्रमांकावर नेतील :  काशिनाथ नखाते

दर महिन्याला एक पुरस्कार द्या

Pckhabar-  स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराने या वर्षी महाराष्ट्र राज्यात पाचवे  स्थान पटकावले याचा शहरवासियांना आनंद आहे. गेल्या वर्षी २६ व्या क्रमांकावर असणारे शहर या वर्षी १९  व्या क्रमांकावर आले तर महाराष्ट्र राज्यात पिंपरी-चिंचवड शहर हे टॉप टेन मध्ये आले. असून स्वच्छता मानांकनानुसार सुधारणा करण्याबरोबरच शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना मिळणारे हक्काचे  वेतन हे अर्धवट न देता पुर्ण देऊन  त्यांना प्रशिक्षण आणि त्यांना प्रोत्साहन पर पुरस्कार दिले  तर शहराला  देशात प्रथम  क्रमांक देऊ शकतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन द्या. आयुक्त आणी  प्रशासनाने प्रोत्साहन द्यावे दर महिन्याला एक पुरस्कार द्यावा  असे आवाहन कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ सर्वेक्षण पाचव्या स्थानावर आल्याबद्दल  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व कष्टकारी संघर्ष महासंघातर्फे  विविध भागातील स्वच्छता कामगारांचा मिठाई वाटप करुन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष इरफान चौधरी, ओमप्रकाश मोरया,  राजेश माने, नाना कसबे, कुसुम जाधव, रमा वाघमारे, गोपीशिंदे, रुक्मिणी केदारी, पुष्पा शिंदे, आशा वाघमारे आदी उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले की प्रत्येक वेळेला कामगारांच्या बाबतीमध्ये अवहेलना केली जाते. कंत्राटदार पगारावर सह्या घेऊन अर्धेच पगार देतात ज्या परिसरात चांगले काम करणा-याना बदली केली जाते. त्यामुळे इच्छा असतानासुद्धा काम करून सुद्धा पगार पूर्णपणे मिळत नसल्यामुळे आणि कंत्राटी कामगार त्यांची लूटमार करत असल्यामुळे निराशा आणी त्यांना अनेक अडचणी येतात . स्वच्छता दूत हा शहरातील महत्त्वाचा घटक असून त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्याचबरोबर त्यांना प्रशिक्षण देऊन सफाई कामासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रभागवार  क्रमांकासह स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केल्यास यामध्ये नक्कीच वाढ होईल आणि आपण प्रथम क्रमांकावर येऊ शकतो असा विश्वास काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *