Talegaon Dabhade Crime News: घोराडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी पती-पत्नीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटले

Pckhabar- घोराडेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या पती-पत्नीच्या डोळ्यात एका भामट्याने मिरची पूड टाकून 60 हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. ही घटना शनिवारी सायंकाळी सात वाजता घडली.
श्रीकृष्ण गंगाधर दराडे (वय-२९, रा. ए३/३०६, कासा इपारिया अपार्टमेंट, वाकडकर वस्ती, वाकड) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पत्नीला घोराडेश्वर मंदिर दाखविण्यासाठी शनिवारी सायंकाळी जात होते. मात्र, अंधार होईल म्हणून मधून परत खाली उतरत असताना पायथ्याच्या मध्यभागी एक अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांना बाजूला ढकलून त्यांच्या आणि पत्नीच्या डोळयात मिरची पावडर टाकली. त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील 60 हजार रुपयांचे दिड तोळ्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेले.
तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.











Leave a Reply