चिखली जलशुद्धकरण केंद्र ते देहू जलवाहिनीच्या कामाचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्र ते देहू अशुद्ध जलउपसा केंद्रापर्यंत एम. एस. जलवाहिनी पुरवणे व टाकण्याच्या कामाचे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आज (मंगळवारी)भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी आमदार महेश लांडगे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके उपस्थित होते.
शहरालासा पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. आजमितीला शहराची लोकसंख्या 27 लाखांच्या घरात आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने चिखली येथे 100 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प ते देहूपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. एम.एस. प्रकारातील या जलवाहिनीचा 1250 ते 1400 इतका डायमीटर आहे. 10 किलोमीटर लांबीच्या या जलवाहिनीतून 100 एमएलडी इतके पाणी उचलण्यात येईल. देहू येथे इंद्रायणी नदीतून पाणी उचलण्यात येणार आहे. ते पाणी चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पात आणले जाईल.
शुद्ध केलेले पाणी चऱ्होली, मोशी, डुडूळगाव, तळवडे, दिघी, चिखली आदी समाविष्ट भागात पुरवठा करण्यात येणार आहे.
…….










Leave a Reply