
Lonavala News : स्वच्छ सर्वेक्षणात लोणावळा शहराचा देशात द्वितीय क्रमांक
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी स्विकारला पुरस्कार
Pckhabar-स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये संपूर्ण भारतात द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या लोणावळा शहराचा महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
दिल्ली येथे हा पुरस्कार वितरण समारंभ आज (शनिवार) पार पडला.
या पुरस्काराचा स्वीकार लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी, तत्कालीन मुख्याधिकारी रवी पवार, विद्यमान मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी केला.
नगराध्यक्षा श्रीमती सुरेखा जाधव म्हणाल्या”स्वछ सर्वेक्षणमध्ये लोणावळा शहराचा देशात दुसरा क्रमांक आला. हा पुरस्कार म्हणजे मावळ तालुक्यासाठी अभिमानस्पद गोष्ट आहे.”











Leave a Reply