Pimpri News : धक्कादायक! पोलीस भरती परीक्षेत काॅपी करण्यासाठी मास्कचा वापर; मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक बॅटरी, मोबाईल सिम कार्डचा वापर
Pckhabar-पोलीस भरती परीक्षेत काॅपी करण्यासाठी एका उमेदवाराने मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक बॅटरी, मोबाईल सिम कार्डचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चाणाक्ष पोलीसांमुळे उमेदवाराची होशारी चालली नाही. हा प्रकार उघडकीस येताच उमेदवार पळून गेला.
हिंजवडी येथील ब्लू रिज शाळेमध्ये उमेदवाराकडे मास्क मध्ये इलेक्ट्रॉनिक डिवाइस सापडले.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई पदासाठी आज (शुक्रवार) पुणे, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या जिल्ह्यात लेखी परीक्षा होणार आहे. सहा जिल्ह्यांतील 444 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होत आहे.
या लेखी परीक्षेसाठी अपर पोलीस आयुक्त, 15 पोलीस उपायुक्त, 25 सहाय्यक पोलीस आयुक्त, 177 पोलीस निरीक्षक, 636 सहाय्यक पोलीस निरीक्षक / उपनिरीक्षक, 11 हजार 838 पोलीस अंमलदार असे एकूण 12 हजार 696 पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा बंदोबस्त होता.











Leave a Reply