Maval News : इंडो ॲथलेटिक्स सोसायटीतर्फे चौराई देवी बाईक अँड हाईक

Maval News : इंडो ॲथलेटिक्स सोसायटीतर्फे चौराई देवी बाईक अँड हाईक


Pckhabar- बाल दिनानिमित्त इंडो ॲथलेटिक्स सोसायटीतर्फे रावेत ते चौराईदेवी अशी दरवर्षी घेण्यात येणारी दहा किलोमीटर सायकलिंग चार किलोमीटर हायकिंग रविवारी 14 नोव्हेंबर रोजी यशस्वीपणे पार पडली.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील पालक विद्यार्थी यांच्या सह 300 हून अधिक जण सहभागी झाले होते. आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारी इंडो ॲथलेटिक्स सोसायटीतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. सदर स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष होते. सर्व सहभागी सायकल सोबत सकाळी सहा वाजता मुकाई चौक रावेत येथून प्रारंभ झाला. यावेळी गणेश कस्पटे, पोलीस अधिकारी अजय दरेकर आयएएस चे गणेश भुजबळ, अजित पाटील यांच्या झेंडा दाखवून फेरिस प्रारंभ केला.

चौराई देवी उपक्रमाचा मार्ग – रावेत – देहूरोड – सोमाटणे फाटा – चौराईदेवी मंदिर असा होता.

पुणे ,पिंपरी-चिंचवड, मावळ परिसर अशा विविध ठिकाणाहून सायकल स्वार सहभागी झाले होते.

गेली दोन वर्षे मोफत उपक्रम राबविण्यात येत आहे. बाल दिनानिमित्त महिला व लहान मुलांचा यामध्ये विशेष सहभाग दिसून आला. गणेश भाऊ कस्पटे युवा मंच यांच्यातर्फे सर्वांना अल्पोपहार आयोजन करण्यात आले होते असे संस्थापक सदस्य गजानन खैरे यांच्या तर्फे सांगण्यात आले.

नियोजनामध्ये इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे रोहित जयसिंघानी, संदीप परदेशी, सुनील चव्हाण, अभिनंदन कासार, तन्मय माने, रवी पाटील , रामदास केदारी, सुधीर कस्पटे, प्रमोद चिंचवडे , गिरीराज उमरीकर, अजित गोरे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *