
T20 World Cup Final : ऑस्ट्रेलियाचा सिक्सर, सहावा वर्ल्ड कप जिंकून घडवला इतिहास!
Pckhabar- टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला धूळ चारत ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपवर कब्जा केला आहे. याआधी कांगारूंनी सर्वाधिक 5 वेळा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. आता त्यांच्या खात्यात 6 वर्ल्ड कप जमा झाले आहेत.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ( Kane Williamson) याने ४८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८५ धावा केल्या. हेझलवूडने त्याची विकेट घेतली. हेझलवूडनं ४ षटकांत १६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडनं २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या.
न्यूझीलंडने दिलेल्या 173 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली होती. एरॉन फिंच (Aron Finch) फक्त 5 रन करून आऊट झाला, पण यानंतर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मिचेल मार्शच्या (Mitchell Marsh) जोडीने न्यूझीलंडच्या बॉलिंगवर तुफान हल्ला केला. मिचेल मार्श 50 बॉलमध्ये 77 रनवर नाबाद राहिला, त्याच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर डेव्हिड वॉर्नरने 38 बॉलमध्ये 53 रन केले. वॉर्नरने 4 फोर आणि 3 सिक्स लगावले. मॅक्सवेलने नाबाद २८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं १८.५ षटकांत ८ विकेट्स राखून विजय मिळवला. आणि केन विलियमसनचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं.
आयसीसीनं जाहीर केलेल्या बक्षीस
रकमेनुसार विजेत्या संघाला १२.२ कोटी, उपविजेत्याला ६.०१ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. उपांत्य फेरीतील पराभूत दोन संघांना प्रत्येकी ३ कोटी दिले जातील.











Leave a Reply