Bhosari News : जागृती मुलींची अंधशाळेतील विद्यार्थ्यांसाठी एम जे एफ लायन अशोक येवले यांचा कौशल्य विकासासाठी पाठपुरावा

Bhosari News : जागृती मुलींची अंधशाळेतील विद्यार्थ्यांसाठी एम जे एफ लायन अशोक येवले यांचा कौशल्य विकासासाठी पाठपुरावा


Pckhabar- नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड,महाराष्ट्र संचालित देवाची आळंदी येथील मुलींच्या जागृती अंधशाळेत शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कौशल्य विकासच्या माध्यमातून “SPOKEN ENGLISH ” व “GERMAN LANGUAGE “चे प्रशिक्षण गेल्या वर्षी सुरू करण्यात आले.

ऑक्टोबर महिन्यात जर्मन भाषेची A1 सर्टिफिकेशनची परीक्षा पुण्यातील “मॅकम्युलर भवन ” या प्रतिष्ठित संस्थेमार्फत घेण्यात आली. त्यात ८ मुलींनी सहभाग घेतला होता व सर्व मुली चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाल्या. श्रावणी नांदवडेकर व चैत्राली गायकवाड यांनी ७०टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळविले व A1 सर्टिफिकेट प्राप्त केले. अशाच पद्धतीने अजून ६ परीक्षा देऊन जर्मन भाषेत प्राविण्य मिळविण्याचा मानस मुलींनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

केदार जाधव, प्रियांका कागीणकर, शैलजा रेगे व कविता नवरे यांनी मुलींना वर्षभर जर्मन भाषेचे धडे दिले.त्यांच्या प्रयत्नातून मुलींना घवघवीत यश मिळाले आहे. संस्था त्यांचे ऋण व्यक्त करते व पुढील मार्गदर्शनासाठी विनंती करते.

जागृती शाळेत कौशल्य विकास उपक्रम राबविण्यासाठी एम जे एफ लायन अशोक येवले यांनी पाठपुरावा केला व त्यास शाळेचे अध्यक्ष श्री सिधू बिराजदार, प्राचार्या मंगला वानखेडे व समुपदेशक आरती ताकवणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

जर्मन भाषा परीक्षेच्या फी साठी लायन उषा येवले व श्री सलील सुहास खेडकर यांनी प्रत्येकी रु २० हजारचे अमूल्य योगदान दिले. संस्था या दानशूरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते.

या वर्षी २० मुली जर्मन भाषेच्या परीक्षेसाठी तयारी करीत आहेत.त्यांच्या फी साठी रु ८८ हजार लागणार आहेत. त्यासाठी समाजातील दानशूरांनी योगदान द्यावे असे कळकळीचे आवाहन अध्यक्ष श्री सिधू बिराजदार यांनी केले आहे. बँकेचा तपशील पुढीलप्रमाणे ;
Bank details
The National Federation of the Blind, Maharashtra
Bank of Baroda, Vile Parle (West) Branch, Mumbai 400056
S.B. A/c. No. 04200100003038, IFSC Code- BARB0VILWES

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *