Nigdi News : किल्ले बनवा स्पर्धेतील सहभागी मावळ्यांना शिवनेरी दर्शन, बक्षीस वाटप
अमोल तुकाराम भालेकर आणि शिवयोद्धा प्रतिष्ठाणचा स्त्युत्य उपक्रम

Pckhabar- अमोल तुकाराम भालेकर आणि शिवयोद्धा प्रतिष्ठाण, रुपीनगर यांनी आयोजित केलेल्या किल्ले बनवा स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. जवळजवळ १५० स्पर्धकांनी यात भाग घेतला. सहभागी प्रत्येक मावळ्यास शिवनेरी दर्शन घडवून अमोल भालेकर यांनी एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.
ज्या ज्या मुलांनी किल्ले बनवले, त्यांना खरोखर किल्ला कसा असतो, किल्ला कसा पहावा, बांधकामाची वैशिष्ट्ये, किल्ल्यावरील जीवन कसे असते ही माहिती मिळावी , शिवरायांबद्दल त्यांच्या मनातील प्रेम आणि कुतूहल जागृत व्हावे. तसेच आपल्या किल्ल्यांचे महत्त्व आणि किल्ले संवर्धन समजावे हा यामागचा उद्देश होता असे अमोल भालेकर यांनी सांगितले.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शिवनेरी किल्ल्यावरच संपन्न झाला. किल्ल्यावर छोटे-मोठे व्यवसाय करून किल्ला जागता ठेवणाऱ्या स्थानिकांच्या हस्ते बक्षीस प्रदान करून अमोल भालेकर यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
प्रथम ६ क्रमांकांना आकर्षक बक्षिसे आणि प्रत्येक सहभागी मावळ्यास टी-शर्ट भेट देण्यात आले. किल्ल्याची माहिती आणि इतिहास ऐकताना सर्वच मुले भारावून गेली होती. पुढच्या वर्षी नवीन उमेदीने किल्ला बनवण्याचा इरादा घेऊन सर्व घरी परतले. अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवून, कोरोनाच्या काळापासून घरात अडकलेल्या मुलांना किल्ल्याची सफर घडवल्याबद्दल पालकांनी आनंद व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी तुषार दिघे, प्रदिप पाटील, दादा तांबे, सखाराम तांबे, गणेश भालेकर, प्रदिप गवारी, जय करंजुले, दाऊद बुराण, योगेश आडसुळ, संतोष हत्तरकीहाल, अनिकेत कांबळे, निवृत्ती भारती, संतोष गायकवाड, विनोद तेली, रामकृष्ण वरकड, प्रदिप गवारी यांनी कष्ट घेतले.

निखिल भालेकर, दर्पण येवले, श्रीकांत भालेकर यांनी संयोजन केले. आशिष मोटे यांनी आभार मानले.











Leave a Reply