Maval News : कवि विठ्ठल दळवी यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर

Pckhabar- दारुंब्रे शाळेतील कोथुर्णे गावचे सुपुत्र श्री विठ्ठल दळवी यांना उडान फाउंडेशन बुलढाणा औरंगाबाद यांनी राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
दळवी यांनी आपल्या सुंदर लेखनीतुन गेली तीन वर्षांपासून रात्रंदिवस थोर संताच्या विचारांची परंपरा जपत, महाराष्ट्राची अस्मिता राखत, छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती सांगत एक हजार काव्यरचना करत ,कविसंमेलने , रोज विद्यार्थ्यां पुढे मांडत, विचारांतुन समाजाची सेवा करत, आदर्श कविभुषण, कविवर्य, राष्ट्रीय साहित्य रत्न फिनिक्स असे 17,पुरस्कार मिळवत मावळचे नाव उंचावत , मावळच्या विचारांच्या आदर्श ठेवत, समाजाला विचारांशिवाय पर्याय नाही, मराठी भाषा, हिंदू धर्म संस्कृतीची ,पवित्र प्राचीन संस्कृतीची ,संताच्या ग्रंथाची, विचारांची झालेली हेळसांड ,वनयजीवांना न मिळणारी जागा, सिमेंटची वाढणारी जंगले, परकिय संस्कृतीच्या आहारी गेलेला मानव आता यांतून सावरणे कठिण झाले आहे.
असे अनेक प्रकारे समाजाची सेवा व्हावी असा समोर मानस ठेऊन ठेवून संताच्या विचारांतुन , पर्यावरणातुन , आरोग्यातुन देश घडावा, यासाठी प्रत्येकानं नैसर्गिक साधनसंपत्तीचा व हिंदू धर्म संस्कृतीचा व मराठी भाषेचा जागर करावा, प्रत्येकानं संताच्या विचारांचा आदर्श ठेवावा, याच मराठी राजभाषेस अभिजात दर्जा मिळावा.
दळवी यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेऊन उडान फाउंडेशन बुलढाणा औरंगाबाद यांनी राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.















Leave a Reply