Yelwadi Crime News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विषारी औषध पिवून आत्महत्या
पतीसह चौघांवर गुन्हा

Pckhabar- हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारिरीक आणि मानसिक छळ करून हाताने मारहाण केली. या त्रासाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध पिवून आत्महत्या केली. ही घटना 31 जुलै 2019 रोजी येलवाडी येथे घडली. याप्रकरणी शुक्रवारी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेहा सचिन बोत्रे (वय-23) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पती सचिन देवीदास बोत्रे (वय-38), सासू, सासरे देवीदास गणपत बोत्रे (वय-58), दिर निलेश देवीदास बोत्रे (वय-32, सर्व रा. येलवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी नेहा आणि आरोपी सचिन यांचा 2016 मध्ये विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर सात महिन्यापासून नेहा यांना आरोपींनी हुंड्यासाठी हाताने मारहाण करून, त्यांचा पाणउतारा करून शारिरीक आणि मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून नेहा यांनी 31 जुलै 2019 रोजी विषारी औषध पिवून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत 12 नोव्हेंबर रोजी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.











Leave a Reply