Dehugaon News : देहूगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत, प्रभाग रचना जाहीर

Dehugaon News : देहूगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत, प्रभाग रचना जाहीर

Pckhabar- पुणे जिल्ह्यातील नव्याने निर्माण झालेल्या देहूगाव नगरपंचायतीची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.  नगरपंचायतीची 17 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली असून, एक वॉर्ड एक सदस्य निश्चित करण्यात आले आहे. यासाठी 2011 च्या जनगणनेनुसार 18 हजार 269 लोकसंख्या गृहीत धरली आहे. या प्रभाग रचनेवर दि.16 नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत.

डिसेंबरमध्ये मुदत संपणार्‍या 17 व मुदत समाप्त झालेल्या 2 आणि नवनिर्मित 7 अशा राज्यातील एकूण 26 नगरपंचायतींसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्याप्रमाणे आज (शुक्रवार) देहूगाव नगरपंचायत कार्यालयात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्या उपस्थितीत ही सोडत पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय आदी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

असे असतील प्रभाग, आरक्षण आणि रचना

प्रभाग क्रमांक-1, आरक्षण- अनुसूचित जमाती सर्वसाधारण
रचना- इंद्रायणी नदी, सरकारी गायरान, ब्रम्हविद्यालय आश्रम, भिमाशंकर सोसायटी रस्ता व भिमाशंकर मंदिर, गाथा मंदिर

प्रभाग क्रमांक-2, आरक्षण- सर्वसाधारण महिला
रचना- गायरान व वनिकरण, तळवडे शिव रस्ता,  इंद्रायणी नदी, बैलगाडा घाट रस्ता, देहू आळंदी रस्ता व खंडेराया मंडळ, साकळी रस्ता व भिमाशंकर सोसायटी रस्ता.

प्रभाग क्रमांक-3, आरक्षण- अनुसूचित जाती महिला
रचना- बैलगाडा रस्ता, शिवरस्ता तळवडे, सरकारी घरकुल, खंडोबा मंदिर

प्रभाग क्रमांक-4, आरक्षण-अनुसूचिच जाती सर्वसाधारण
रचना-  सरकारी गायरान, घरकुल रस्ता, तळवडे शिव रस्ता,  देहू आळंदी रस्ता, पेट्रोलपंप, विठ्ठल मंदिर, देहू आळंदी रस्ता
प्रभाग क्रमांक-5, आरक्षण-सर्वसाधारण
रचना- देहू आळंदी रस्ता, विठ्ठलवाडीचा राजा गणपती मंडळ, तळवडे हॉस्पीटल, शिवरस्ता, कैंटेनमेंट हद्द, काळोखेवाडा रस्ता.

प्रभाग क्रमांक-6, आरक्षण-सर्वसाधारण महिला
रचना- देहू आळंदी रस्ता, काळोखे वाडा रस्ता, मुंगसे आळी, कँटेनमेंट हद्द काळोखेवाडा रस्ता, विठ्ठलनगर, माळीनगर हद्द, जुना पालखी मार्ग.

प्रभाग क्रमांक-7, आरक्षण- सर्वसाधारण
रचना- दिगांबर माळी निवास रस्ता, निसर्ग सोसायटी रस्ता, नवचैतन्य, देहू आळंदी रस्ता सोसायटी, ओंकार सोसायटी दक्षिण भाग, ओम साई सोसायटी

प्रभाग क्रमांक-8, आरक्षण- सर्वसाधारण महिला
रचना- काळोखे शेती व एस.टी. स्टैंड परिसर, ओंकार सोसायटी,  देहू आळंदी रस्ता, देहू ते देहुरोड रस्ता, एस. टी स्टैंड ते कमान.

प्रभाग क्रमांक-9, आरक्षण- अनुसूचित जाती महिला
रचना- बाह्यवळण रस्ता, ओढ्यापर्यंत, साईदर्शन सोसायटी व इंद्रायणी सोसायटी, देहूरोड रस्ता, कॉरपोरेशन बँक, गाथा मंदिर रस्ता, चावडी.

प्रभाग क्रमांक-10, आरक्षण- सर्वसाधारण
रचना-  येलवाडी रस्ता, बाह्यवळण रस्ता, भैरवनाथ चौक, फोरएस इंग्लिश मेडीयम स्कुल दक्षिणेस जुना ओढा, खान, सार्वजनिक हाप्सा, पोलीस चौकी,  इंद्रायणी.

प्रभाग क्रमांक-11, आरक्षण-नागरिकांचा मागास प्रवर्ग-सर्वसाधारण
रचना- प्राथमिक आरोग्य केंद्र, देहू रोड रस्ता,  देहू-देहूरोड रस्ता, संभाजी चौक, महाव्दार रस्ता काही भाग, मोरे यांचे निवास, जंगली महाराज रस्ता, महाव्दार चौक

प्रभाग क्रमांक-12, आरक्षण- नागरिकांचा मागास प्रवर्ग- महिला
रचना-  चौदा टाळकरी कमान, सुंदर गल्ली रस्ता शिंदे ट्रेडर्स,  शिवाजी चौक, जंगली महाराज रस्ता, इनामदार वाडा, मश्चिद, सुतार आळी,  इंद्रायणी नदी घाट

प्रभाग क्रमांक-13, आरक्षण-सर्वसाधारण महिला
रचना-सुतार आळी रस्ता व गावडे हॉस्पीटल, देहू-देहुरोड रस्ता, मुख्य कमान व बँक ऑफ महाराष्ट्र, पाण्याच्या टाकीचा रस्ता, महालक्ष्मी मंदिर, शिवाजी चौक ते संभाजी चौक.

प्रभाग क्रमांक-14, आरक्षण-नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
रचना-  खंडोजी बाबा धर्मशाळा व महावितरण ऑफीस, पद्मश्री हॉस्पीटल, सह्याद्री सोसायटी रस्ता, जुना पालखी मार्ग, पोस्ट ऑफीस, कापुर ओढा, परंडवाल चौक, इंद्रायणी नदी माळीनगर हद्द

प्रभाग क्रमांक-15, आरक्षण- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
रचना-इंद्रायणी नदी, बोडकेवाडी रस्ता, परंडवाल चौक, महात्मा फुले चौक दक्षिणेस- कँटेनमेंट हद्द, जगताप मळा, इंद्रायणी नदी.

प्रभाग क्रमांक-16, आरक्षण- सर्वसाधारण
रचना- देहू- देहूरोड रस्ता, अनगडशाहीवाली दर्गा, महात्मा फुले चौक,  विठ्ठलनगर माळीनगर हद्द, गुलमोहर पार्क सोसायटी,  देहूरोड कँटेनमेंट हद्द, जिल्हा परिषद शाळा, माळीनगर व देहू-देहूरोड रस्ता.

प्रभाग क्रमांक-17, आरक्षण- सर्वसाधारण महिला
रचना- बोडकेवाडी रस्ता, कृष्ण मंदिर,  गर्ग प्रोव्हीजन स्टोअर्स, देहू-देहूरोड रस्ता कँटेनमेंट हद्द, बोडकेवाडी रस्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *