Chikhali News : दत्ताकाका साने प्रतिष्ठाणच्या सेवाभावी कार्याचा गौरव

Chikhali News : दत्ताकाका साने प्रतिष्ठाणच्या सेवाभावी कार्याचा गौरव


Pckhabar-कोरोना आणि लॉकडाऊन कालावधीतील सवर्सामान्य जनतेसाठी अहोरात्र केलेले कार्य तसेच सामाजिक क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत चिखली मोरेवस्ती येथील स्व. दत्ता काका साने प्रतिष्ठान यांचा तुळापूर येथे शंभूशौर्य दीपोत्सव सोहळ्या निमित्त छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीच्यावतीने गौरव करण्यात आला.

माजी गृहमंत्री स्व. आर. आर. आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील तसेच आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष यश यांनी हा सन्मान स्वीकारला. रुपेश मोरे, दीपक साने, उमाकांत बिराजदार व प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

या पुरस्काराने सामाजिक कार्य करण्यासाठी नवी ऊर्जा आणि उमेद मिळाली आहे. त्याबद्दल छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती यांचा मी मनापासून आभारी असल्याची भावना यश साने यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *