Bhosari political News : भाजपा भोसरी विधानसभा प्रभारीपदी विजय फुगे यांची निवड

Bhosari political News : भाजपा भोसरी विधानसभा प्रभारीपदी विजय फुगे यांची निवड


Pckhabar-भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीर भोसरी विधानसभा मतदार सांघाच्या प्रभारीपदी विजय फुगे यांची निवड करण्यात आली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या स्वाक्षरीने विजय फुगे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, मुख्य प्रवक्ते अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र सुपूर्त करण्यात आले.

शहर भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये विजय फुगे सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर त्यांची भोसरी मतदार संघाच्या प्रभारीपदी निवड केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *