Pimpri News : ” कर्मयोगी नमो” लघुपट स्पर्धांच्या जाहिरात पत्रकाचे प्रकाशन उत्साहात

Pimpri News : ” कर्मयोगी नमो” लघुपट स्पर्धांच्या जाहिरात पत्रकाचे प्रकाशन उत्साहात


Pckhabar- भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश यांच्या विद्यमाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्व संपन्न कारकीर्दीवर आधारीत “कर्मयोगी नमो” या लघुपट स्पर्धेच्या जाहिरात पत्रकाचे प्रकाशन उत्साहात करण्यात आले.

यावेळी भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश संयोजक शैलेश गोजमगुंडे, शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खापरे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेश चिटणीस अनुप मोरे  सांस्कृतिक आघाडी संयोजक धनंजय शाळीग्राम, प्रदेश सहसंयोजक उमेश घळसासी, आदी रामचंद्रन, पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक नरेंद्र आमले, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, बाबू नायर, सांस्कृतिक प्रकोष्ठ सहसंयोजक शाहीर चेतन हिंगे, नगरसेवक सागर गवळी, कुंदन गायकवाड, विकास डोळस आदी उपस्थित होते.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश संयोजक शैलेश  गोजमगुंडे यांनी स्पर्धेची संपूर्ण माहिती देताना पिंपरी-चिंचवड शहरातील कलाकार, विद्यालय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उस्पुर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. पिंपरी-चिंचवड शहरतील युवा कलाकार व विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊन पिंपरी-चिंचवड शहराचा सांस्कृतिक ठसा संपूर्ण राज्य भर उमटवतील, असे प्रतिपादन महेश लांडगे यांनी स्पर्धेला शुभेच्छा देताना केले.

कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक आघाडी पिंपरी-चिंचवड शहर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन शाहीर चेतन हिंगे यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *