Dehugaon Crime News : दरवाजा उघडा ठेवणे पडले महाग, चोरट्यांनी मारला डल्ला

Pckhabar- उघड्या दरवाज्यातून घरात प्रवेश करून चोरट्याने घरातील एक लॅपटॉप, मोबाईल असा 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना देहूगावातील महाव्दार चौकात रविवारी सकाळी पावणेसात ते साडेआठच्या सुमारास घडली.
आशिष राजेश अगरवाल (वय-31, रा. महाव्दार चौक, देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा रविवारी सकाळी पावणेसात ते साडेआठच्या सुमारास उघडा होता. अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाज्यातून घरात प्रवेश केला. घऱातील लिनोव्हा कंपनीचा 1 लॅपटॉप आणि ओपो कंपनीचा 1 मोबाईल असा 40 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.








Leave a Reply