Pimpri News : 18 नोव्हेंबर रोजी विषय समिती सभापतींची निवडणूक
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड दि.18 नोव्हेंबर रोजी होणार आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी या बाबत आदेश काढले आहेत.

महापालिका मुख्यालयातील मधुकर पवळे सभागृहात सकाळी 11 वाजता ही निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्तांनी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांना पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती, क्रिडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती, शिक्षण समिती अशा पाचविशेष समित्यांचे सभापती या निवडणुकीत निवडले जाणार आहेत.

दरम्यान, विशेष समित्यांमध्ये भाजपचे वर्चस्व असल्याने पाचही समित्यांमध्ये भाजपचे सभापती होणार आहेत. तर हापालिका निवडणुक काही महिन्यावर आली आहे. निवड झालेल्या सभापतींना अल्प काळाकरिता हे पद मिळणार असले तरी सभापती म्हणून मिरवण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे फिल्डिंग लावली आहे.







Leave a Reply