
Sports News : न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी रोहित शर्माची कर्णधारपदी नियुक्ती
पिंपरी-चिंचवडच्या ऋतूराज गायकवाडचा समावेश
Pckhabar- बीसीसीआयने न्यूझीलंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. कर्णधार पदी रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आली आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. यात ऋतूराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर यासारख्या आयपीएलमध्ये धमाका केलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे विराट कोहली. जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी यांना संघात स्थान दिल्याचे दिसत नाही.
India’s T20I squad: रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उप-कर्णधार), ऋतूराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.







Leave a Reply