
Nigdi Crime News : कमरेच्या बेल्टने मारून एकाचा खून
Pckhabar-विनाकारण कमरेच्या बेल्टने जबर मारून झोपेत असलेल्या एका व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे घडली.
तानाजी कमजले (वय 55, रा. मोरे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रमेश बगाटे (वय 48, सध्या रा. ट्रान्सपोर्ट नगर निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिजीत गुंजाळ (नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बगाटे व मयत तानाजी हे दिवाळी पाडव्याच्या दिवशी ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास झोपले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी गुंजाळ याने काहीही कारण नसताना फिर्यादी बगाटे व मयत तानाजी यांना कमरेच्या बेल्टने मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तानाजी यांचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.







Leave a Reply