


Dehuroad Crime News : रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे अमिष ; सहा जणांची 26 लाखांची फसवणूक
Pckhabar-रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एकाने सहा जणांकडून तब्बल 26 लाख घेत भारतीय रेल्वेच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून त्यांना दिली. मात्र, कागदपत्रे बनावट असल्याचे लक्षात येताच पोलीसात धाव घेत तक्रार देण्यात आली. हा प्रकार 28 जानेवारी 2020 ते 14 जानेवारी 2021 या कालावधीत देहूरोड येथे घडला.

राहुल धौलपुरीया असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तसेच सुरेश हनुमंत राव, सचिन प्रकाश तुळे, वैभव तुकाराम भिगवणकर आणि एका महिलेकडून आरोपीने प्रत्येकी पावणे पाच लाख रुपये घेतले. तसेच फिर्यादी यांचे वडील हनुमंता दोडप्पा राव यांच्याकडून हात उसने म्हणून वेळोवेळी दोन लाख 25 हजार रुपये घेतले. सहा जणांकडून आरोपीने तब्बल 26 लाख रुपये घेतले. त्यांना रेल्वेमध्ये नोकरी न लावता भारतीय रेल्वेच्या नावाने बनावट कागदपत्रांचा उपयोग करून फिर्यादी आणि शासनाची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.







Leave a Reply