Nigdi News : अमोल भालेकर यांनी साजरी केली तृतीयपंथीयांसोबत दिवाळी




Pckhabar-शिवयोद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल भालेरकर यांनी दिवाळीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबविला आहे. दिवाळी म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन आनंद लुटण्याचा सण, परंतु समाजाने कायम दुर्लक्षित केलेला घटक म्हणजे तृतीयपंथी. यांना सुद्धा दिवाळीचा आनंद घेता यावा व त्यांची सुद्धा दिवाळी गोड व्हावी या हेतूने अमोल भालेकर यांनी रुपीनगर येथील तृतीयपंथी समाजसोबत दिवाळी साजरी केली. प्रत्येकाला मिठाई आणि भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आले. प्रसंगी त्यांचे आराध्य दैवत देवी यलम्मासं अमोल भालेकर यांनी साडीचोळी अर्पण करून आशीर्वाद घेतले.

अमोल भालेकर म्हणाले ” साक्षात भगवान शंकर सुद्धा आपणांस अर्धनारीनटेश्वर रुपात पाहायला मिळतात. असे असूनही समाज यांच्याकडे कायम दुर्लक्ष करत आला आहे. परंतु सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व या सर्वांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून मी आपणा सर्वांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलो आहे. सध्याच्या काळात अनेक तृतीयपंथी लोकांनी यशाची अनेक शिखरे सर केली आहेत. काही राज्यांच्या विधिमंडळात सुद्धा ते प्रतिनिधित्व करतात. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. आपणासही आपल्या भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा. आपणास काहीही अडचण आल्यास अथवा मदत लागल्यास मला केव्हाही संपर्क करू शकता.’ असे नमूद केले.

या कार्यक्रमाने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होते. ‘एवढ्या वर्षात प्रथमच कोणीतरी आमचाही विचार केला आणि आमच्यासोबत दिवाळी साजरी केली. आम्हाला खूप आनंद झाला. अमोल भालेकर यांच्याप्रमाणेच बाकी समाजाने सुद्धा आम्हाला सामील करून घ्यावे. ‘ या शब्दात तृतीयपंथीयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे संयोजन शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले.







Leave a Reply