Chinchwad News : चिंचवडला आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाबरोबरच रंगणार दिवाळी पहाट

Chinchwad News : चिंचवडला आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाबरोबरच रंगणार दिवाळी पहाट

-सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर, सुवर्णा माटेगावकर यांच्यासह प्रसेनजीत कोसंबी यांच्या सुरेल गाण्यांची रंगणार मैफिल

लहानापासून थोरांपर्यंत विविध स्पर्धा आणि बक्षिसे, महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन

Pckhabar-  दिवाळीनिमित्त  चिंचवडकरांसाठी खास पराग माटेगावकर प्रस्तुत पवना काठ दिवाळी पहाट   उद्या (गुरुवार) पहाटे साडेपाचला हा कार्यक्रम होणार असून यावेळी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री केतकी माटेगावकर, सुवर्णा माटेगावकर, व प्रसेनजीत कोसंबी यांची सुरेल व मधुर गाण्यांची मैफिल रंगणार आहे.

 कार्यक्रम, स्पर्धा, बक्षिसे असा मनोरंजनाचा ‘फराळ’ यंदा चाखायला मिळणार आहे. चिंचवड येथील नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.यामध्ये पवना काठ दिवाळी पहाट, सेल्फी विथ क्रांतिवीर चाफेकर टॉवर, रंग माझा साडीत वेगळा, आकाश कंदील स्पर्धा यांचा समावेश आहे.

याबाबत नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी माहिती दिली. त्या गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीचा आपण सामना करत असताना सण समारंभ, उत्सव सर्व काही कुलप बंद केले. मात्र आता परिस्थिती थोड्या प्रमाणात सुधारत असताना नागरिकांना आनंद मिळावा यासाठी या स्पर्धांचे आयोजन केले आहे यामध्ये सप्तरंग दिवाळी पहाट महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये महिलांनी पारंपारिक पेहरावामध्ये जिजाऊ पर्यटन केंद्र येथे श्री मोरया गोसावी मंदिर कळसाचा व्हयू येईल अशा पद्धतीने सेल्फी घेवून गुरुवार दि.४ नोव्हेंबर वेळ सकाळी ०५:३० ते १० या वेळेत ७७१९०९२९२९ या क्रमांकावर व्हॉट्स अॅप करायचा आहे. सर्व वयोगटातील महिलांना या स्पर्धेमध्ये भाग घेता येणार आहे.

पवना काठ दिवाळी पहाट या अंतर्गत रंग माझा वेगळा या स्पर्धेत देखील आयोजन करण्यात आले आहे यामध्ये विविध गट करून स्पर्धा आयोजित केलेली आहे स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन तरुणी (५ ते १० चा ग्रुप)  महिला, (५ ते ७ चा ग्रुप)  ज्येष्ठ महिला,(५ ते ७ चा ग्रुप), एकाच कुटुंबातील महिलांसाठी (३ ते ५ चा ग्रुप) अशी वर्गवारी करण्यात आलेली आहे या स्पर्धेसाठी चिंचवड येथील जिजाऊ पर्यटन केंद्र येथे फोटो घेवून गुरुवार दि. ४ नोव्हेंबर वेळ: सकाळी ६ ते १० या वेळेत ७७१९०९२९२९ या नंबर वर व्हॉट्स अॅप करायचा आहे.

सेल्फी विथ फॅमिली या स्पर्धेसाठी  सहकुटूंब सेल्फी विथ पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धकांनी पारंपारिक पेहरावामध्ये जिजाऊ पर्यटन केंद्र येथे श्री मोरया गोसावी मंदिर कळसाचा व्हयू येईल अशा पद्धतीने सेल्फी घेवून गुरुवार दि.४ नोव्हेंबर रोजी सकाळी ०५:३० ते १० या वेळेत ७७१९०९२९२९ या नंबर वर व्हॉट्स अॅप करायचा आहे. नागरिकांनी या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपला दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *