Bhosari News : प्रितम प्रकाश महाविद्यालयात कोविड प्रतिबंधक लसीकरण

Bhosari News : प्रितम प्रकाश महाविद्यालयात कोविड प्रतिबंधक लसीकरण

Pckhabar-रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी , प्रीतम प्रकाश महाविद्यालय आणि पिंपरी चिंचवड म. न. पा. आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रितम प्रकाश महाविद्यालयात कोविड १९ मोफत लसीकरणाची मोहीम आयोजित करण्यात आली होती. याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मानवी जीवनावर वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळी संकटे आली. याचा पूर्व इतिहास माहित असल्याने सध्याच्या परिस्थितीत उध्दभवलेल्या कोरोना संकटामुळे मानवी जीवन उध्वस्त झाले. ते पूर्वपदावर आणण्यासाठी गेली अनेक दिवसांपासून ” मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत ” कोविड १९ मोफत लसीकरण मोहीम राबविली जात आहे. आरोग्य हेच समाजसेवेचे व्रत स्वीकारून सामान्य लोकांपर्यंत लस पोहोचविली जात आहे, असे प्रतिपादन विद्यमान नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी तुषार लाहोरकर असिस्टंट गव्हर्नर-रोटरी क्लब डिस्ट्रिट ३१३१ ; भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोककुमार पगारिया, डॉ. उपाध्ये तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य सदाशिव कांबळे उपस्थित होते.

याप्रसंगी रोटरी क्लब डिस्ट्रिट ३१३१ असिस्टंट गव्हर्नर मा.तुषार लाहोरकर यांनी रोटरी क्लब राबवित असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. त्याचाच एक भाग म्हणून कोविड १९ अंतर्गत रोटरी क्लबने वेगवेगळे आरोग्य सेवे अंतर्गत उपक्रम पार पाडले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ. अशोककुमार पगारिया यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सामान्य लोकांपर्यंत कोविड १९ लस मिळावी यासाठी प्रयत्नात होतो. आज खऱ्या अर्थाने या लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाल्याचा मनस्वी आनंद होत आहे. विद्यार्थी पालक आणि सामान्य नागरिकांपर्यंत लस दिली जाणार आहे. याचा अधिकाधिक लोकांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले.

डॉ. उपाध्ये यांनी व्यायाम, आहार आणि पुरेशी विश्रांती या तत्वांचा अंगीकार करावा असा उत्तम आरोग्यासाठी सल्ला दिला. प्राचार्य मा. सदाशिव कांबळे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *