Dehugaon News : सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे हरिश्चंद्रगडावर दीपोत्सव

Dehugaon News : सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे हरिश्चंद्रगडावर दीपोत्सव

Pckhabar-प्रतीवर्षी अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरे करणारे श्रीक्षेत्र देहूतील सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या तरुणांनी ‘दिवाळीचा पहिला दिवा गडावर’ या उपक्रमा अंतर्गत  हरिश्चंद्रगडावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सवानंतर तरूणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला.

श्रीक्षेत्र देहू येथील श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाचे तरुण गेल्या 4 वर्षांपासून ‘दिवाळीचा पहिला दिवा गड-किल्ल्यांवर’  हा स्त्युत्य असा उपक्रम साजरा करत आहेत.

मंडळाचे कार्यकर्ते दरवर्षी वसुबारसेला गड-किल्ल्यांवर जाऊन त्या ठिकाणी आपली दिवाळी साजरी करतात. यापुर्वी तरूणांनी राजगड, रायगड, तोरणा अशा किल्ल्यांवर  दीपोत्सव साजरा करुन दिवाळीचा प्रारंभ केला आहे.  यावर्षी दिवाळीची सूरुवात तरूणांनी किल्ले हरिश्चंद्रगडावर दीपोत्सव साजरा करुन केला आहे.

गुलामगिरीच्या अंधकारात खितपत पडलेल्या रयतेला स्वराज्याचा प्रकाश देत तिमिराकडून तेजाकडे नेणाऱ्या शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन मंडळाचे कार्यकर्ते दिवाळीची सुरूवात करतात. दीपोत्सव सोहळा म्हणजे तिमिराकडून तेजाकडे नेणारा, नवचैतन्य निर्माण करणारा आहे. दिवाळीची सुरूवात गडावर केल्याने एक नवी प्रेरणा आणि उर्जा मिळते, असेही मंडळाचे कार्यकर्ते म्हणाले.