Pimpri News : आमदार अण्णा बनसोडे यांच्या वतीने 300 कलाकारांना दिवाळी फराळ, अन्नधान्य वाटप

Pimpri News : आमदार अण्णा बनसोडे यांच्या वतीने 300 कलाकारांना दिवाळी फराळ, अन्नधान्य वाटप

पिंपरी :  पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या जवळपास तीनशे सभासदांना  आमदार आण्णा बनसोडे यांच्यातर्फे  दिवाळी फराळ व अन्नधान्य किट वाटप रविवारी करण्यात आले.

त्यामध्ये ऑर्केस्ट्रा- लोकसंगीत-लोककला क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे मोहम्मद रफी, शेख इक्बाल, दरबार, माणिक बजाज, सुबोध चांदवडकर, शंकर जाधव, शशिकांत कोठवळे, रुहि संगमनेरकर, अलका जगताप, शीतल चोपडे, संगीता लाखे, अर्चना जावळेकर, शिवांगी शर्मा, उषा करंबळेकर, वर्षा जगताप, जूनियर अमिताभ बच्चन, ज्यू.रजनीकांत, ज्यू. जॉनी लिव्हर, ज्यू. देवानंद तसेच अवसरी दादा या सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला.

आमदार अण्णा बनसोडे यांनी यावेळी उपस्थित कलाकारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व माझ्या सर्व कलाकार बंधू भगिनींच्या पाठीशी मी कायम उभा असेल त्याचे प्रश्न सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना भेटून सोडविणार आहे असे आश्वासन दिले.

कार्यक्रमास माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी,  संदीप चिंचवडे,  जगदीश शेट्टी,  काळूराम पवार, सनी ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्त्या  नीता ढमाले, सतीश लांडगे, निलेश शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम पार पाडण्यासाठी आमिर शेख, संजय मगर, मीठू पवार व  पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *