Pimpri News : रेशन दुकानदारांनी किडलेला निकृष्ठ बारीक गहू, तांदूळ बदलून द्यावा : क्रांतिकुमार कडुलकर

Pimpri News : रेशन दुकानदारांनी किडलेला निकृष्ठ बारीक गहू, तांदूळ बदलून द्यावा : क्रांतिकुमार कडुलकर
Pckhabar- ऑक्टोबर  महिन्यांत रास्त भाव धान्य दुकानांतून निकृष्ट दर्जाचा गहू विकला गेला आहे. दिवाळीच्या सणाच्या दिवसात अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी  गोरगरीब श्रमिकांची चेष्टा करून अतिशय निकृष्ठ दर्जाचा किडलेला गहू आणि बेचव तांदूळ कार्डधारकांच्या माथी मारला आहे. देशातील अन्नधान्य महामंडळ उत्तम दर्जाचा गहू खरेदी करत असते. गेली तीन महिने चांगला गहू वितरण करणाऱ्या सरकारने दिवाळीत गरिबांची चेष्टा करण्यासाठी निकृष्ठ अन्नधान्य वितरित केले आहे काय? असा सवाल श्रमिक कार्यकर्ते क्रांतीकुमार कडूलकर यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत कडूलकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अन्नसुरक्षा कायदा(२०१३)नुसार रेशनवर पौष्टीक धान्य देण्याची सक्ती सरकारला केलेली आहे.


फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया(FCI) या भारत सरकारच्या गुणवत्ता विभागाद्वारे राज्यात अन्नधान्य पाठवताना विशेष काळजी घेतली जाते. अन्नधान्य वितरणधिकारी आणि राज्य सरकारच्या अन्नपुरवठा अधिकाऱ्यांनी रेशनवर वितरित केलेला गहू तांदूळ शिजवून खावा आणि नंतरच तो गरिबांना वितरित करावा. शहरातील दोन लाखाहून जास्त नागरिक रेशनिंगवर अवलंबून आहेत. हे पिंपरी चिंचवड शहरातील अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना माहीत नाही काय?त्यांनी किडे वाळवणारा गहू परत घ्यावा. चांगला गहू आणि तांदूळ शासकीय गोदमातून गायब होतोय असा आरोप श्रमिक कार्यकर्ते क्रांतिकुमार कडुलकर यांनी केला आहे.

दहा किलो रेशनच्या गव्हात दोन किलो बाहेरचे महाग गहू मिसळावे लागतात. गहू दळून आणणल्यानंतर पीठ मळताना त्यामध्ये कोमट पाणी घालावे लागते. ही उठाठेव केल्याशिवाय चपाती खाण्यायोग्य होत नाही. शासनाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. आणि या दिवाळीच्या सणासाठी सरकारने गहू तांदूळ बदलून द्यावेत आणि तेल, साखर, चहा, रवा गोरगरिबांना मोफत वितरित करावा, अशी मागणी कडूलकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *