Dehugaon News: ऊसतोड कामगारांची दिवाळी गोड

Dehugaon News: ऊसतोड कामगारांची दिवाळी गोड

 

ऊसतोड बंधूंना दिवाळीनिमित्त अभंग प्रतिष्ठान, वाचनवेड संस्थेच्या वतीने किराणा साहित्य भेट

Pckhabar-अभंग प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू यांच्या माध्यमातून वाचनवेड संस्थेचे किरीटी श्यामकांत मोरे यांच्या अनमोल सहकार्यातून सालाबादप्रमाणे या दिवाळीनिमित्त ऊसतोड कामगार बंधू भगिनींच्या परिवारासाठी दिवाळीनिमित्त किराणा साहित्य भेट देण्याचा उपक्रम करण्यात आला.


येलवाडी परिसरामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. दिवाळीनिमित्त दिलेली ही भेट निश्चितपणे आमच्या या कष्टमय जीवनात आनंद निर्माण करणारी आहे अशा भावना या बंधू-भगिनींनी यावेळी व्यक्त केल्या.

या प्रसंगी येलवाडी गावचे माजी उपसरपंच रणजीत गाडे, चेअरमन चेतन बोत्रे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गाडे, अभंग प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुरेश गाडे, सचिव, सलीम मुलाणी ,उपसरपंच सचिन कुंभार, सागर मोरे, कॅडबरी कंपनीचे सदस्य सतीश काळोखे शशिकांत गुरव, विजय मोरे, अजिंक्य साकोरे, विजय ठाणगे, धनंजय मुसुडगे, प्रा. विकास कंद, विक्रम भोईटे,अशितोष काळोखे हे अभंग प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *