Pimpri RTO News : परमनंट लायन्ससाठी मासिक दौऱ्याचे आयोजन



Pckhabar- नोव्हेंबर 2021 मध्ये पक्की अनुज्ञप्ती ( परमनंट लायन्स) मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर आणि वडगाव मावळ येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आल्याची माहिती परिवहन अधिकारी अतूल आदेश यांनी दिली आहे.

पक्क्या अनुज्ञप्तीच्या ( परमनंट लायन्स) चाचणीसाठी 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी खेड, 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी मंचर, 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी जुन्नर, 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी वडगाव मावळ येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पक्की अनुज्ञप्तीसाठी 90 एवढा उपलब्ध कोटा असून तो 3 नोव्हेंबर रोजी 5 वाजता उपलब्ध होणार आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर अर्जदारांनी गर्दी टाळण्याच्यादृष्टीने पूर्वी (अपॉईंटमेंट) घेतलेल्या वेळेतच हजर राहावे, तसेच कोरोना विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतूल आदे यांनी केले आहे.











Leave a Reply