Dehugaon News: कर्तव्य फाऊंडेशनतर्फे 125 कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप


Dehugaon News: कर्तव्य फाऊंडेशनतर्फे 125 कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप
Pckhabar-देहूगाव येथील विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या कर्तव्य फाऊंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही 125 गरजू कुटुंबांना दिवाळी फराळचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

देहूगाव येथील संतकृपा मंगल कार्यालयात रविवारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कर्तव्य फाऊंडेशनच्या सर्व सभासदांच्या हस्ते गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ कीटचे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या महामारीने अनेक सर्वसामान्य, गोर-गरीब नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गोर-गरीबांच्या घरीही मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा व्हावा, या उद्देशाने कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी गरजू कुटुंबांचा शोध घेऊन दिवाळी फराळचे वाटप केले जाते.या उपक्रमासाठी सहकार्य करणार्‍या सर्व दानशूर नागरिकांचे कर्तव्य फाऊंडेशनच्या सदस्यांनी आभार मानले.

दरम्यान, फाऊंडेशनच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून दरमहा राशन योजनेसह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *