Pimpri Crime News : पिंपरी मार्केटमध्ये महिलेची 53 हजार रूपये असलेली पर्स चोरीला

Pimpri Crime News : पिंपरी मार्केटमध्ये महिलेची 53 हजार रूपये असलेली पर्स चोरीला


Pckhabar- दिवाळी सणानिमित्त पिंपरी मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलेची 53 हजार रूपये असलेली पर्स चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता पिंपरीतील बाबा मार्केटजवळ घडली.


सोनम जयप्रकाश उपाध्याय (वय-28, रा. कुंजीर कॉलनी, पिंपळे सौदागर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी या शनिवारी सायंकाळी पिंपरी मार्केटमध्ये दिवाळीसणानिमित्त  खरेदीसाठी आल्या होत्या. बाजारपेठेत प्रचंड गर्दी असल्याने गर्दीचा फायदा घेऊऩ अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांची 53 हजार रूपयांची रोकड असलेली पर्स चोरून नेली. पर्समध्ये फिर्यादी यांचे आधारकार्ड, वाहन परवाना असा 53 हजार 150 रूपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *